🌟माणसातील दुर्गुण काढून टाकते ती वारी - ह.भ.प.तुळशीदास महाराज देवकर


🔹यादव-पैठणरांच्या पायी वारीचे मावंदे ऊत्साहात🔹


गंगाखेड (दि.१५ जुलै २०२३) : पंढरीची वारी हे सामाजिक समतेचे सर्वात मोठे ऊदाहरण होय. ही वारी म्हणजे वारकऱ्यांच्या अंगातील असलेले दुर्गुण काढून टाकणारी प्रक्रिया आहे. सहभागी वारकऱ्याच्या अंगातील किमान एक अवगूण गळून पडणे हे वारीचे साध्य आहे असे प्रतिपादन ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी केले. 

गोविंद यादव, नागेश पैठणकर, संजय सोनटक्के यांनी केलेल्या पायी वारीच्या मावंदे कार्यक्रमानिमित्त झालेल्या किर्तन सेवेत ते बोलत होते. गंगाखेड शहरातील संत सावता माळी मंदिरात काल हा कार्यक्रम संपन्न झाला. वै. सोपानकाका महाराज ईसादकर पायी दिंडीचे चालक ह. भ. प. निवृतीनाथ महाराज ईसादकर यांची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती. 

यावेळी बोलताना ह. भ. प. देवकर यांनी श्रोत्यांना वारीचे महत्व, माऊलींची श्रीमंती पटवून दिली. या वारीत अनेक भक्त मंडळी सहभागी होत असतात. त्यात बरेच अवगुणी लोकही असू शकतात. या प्रवासात त्यांच्यातील अवगूण गळून पडण्याची प्रक्रिया सुरू होते. वारी संपेपर्यंत त्यांच्यात असलेला किमान एक अवगुण तरी गळून पडतोच. हेच वारीचे साध्य असून ते सिद्ध होतेच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दिंडी चालक नाथ महाराज, गोविंद यादव यांनी आपले वारीतील अनुभव कथन केले. किर्तनानंतर संताजी महाराज मठात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली. कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोषराव मुंडे, अनिलसेठ यानपल्लेवार, गुंडेराव देशपांडे, गजानन महाजन यांच्या वतीने वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर गोरे, व्यंकटेश यादव, सागर गोरे, भागवत यादव, मारोती गोरे, रमेश शिंगणे, धनंजय गोरे, बालासाहेब यादव, परसराम गिराम, सुहास देशमाने, दुर्गादास गिराम, सुधाकर शिंदे, रामा गिराम, प्रथम यादव, साहिल पैठणकर आदिंनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या