🌟त्यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित संस्कृति महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सत्कारा प्रसंगी त्यांनी घोषणा केली🌟
पूर्णा (दि.११ जुलै २०२३) : डॉ.दत्तात्रय वाघमारे यांनी परभणी जिल्ह्यात केलेल्या आरोग्यसेवा,सामाजिक आणि शैक्षणिक सेवेस जिल्ह्यात तोड नाही सतत साठ वर्षापासून त्यांनी या सेवेत स्वतःला आणि कुटुंबाला झोकून दिले आहे अशा निस्वार्थी व्यक्तिमत्वास सरकारने पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी संविधान गौरव समिती पुर्णाच्या वतीने रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित संस्कृति महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सत्कारा प्रसंगी केली.
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.केशव जोंधळे होते रिपांई नेते प्रकाश कांबळे यांचा वाढदिवस पुर्णेत "संकल्प दिन" म्हणून साजरा केला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीच्या वतीने केले जाते सकाळच्या सत्रात बुद्ध विहार येथे बुद्ध मुर्तीला वंदन करून शहरातील डॉ .बाबसाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्ते आनंद साजरा करतात.तो कार्यकर्त्यांनी केला.त्यानंतर संस्कृती महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
संविधान गौरव समिती,भारतीय बौद्ध महासभा,बुद्ध विहार समिती, वकील संघ पूर्णा,वंचित बहुजन आघाडी,पूर्णा,बचपन बचाव संघटना,महिला मंडळ,संस्कृती महाविद्यालय कर्मचारी वर्ग,सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटना पूर्णा आदिंसह आंबेडकरी चळवळीचे सुप्रसिद्ध विचारवंत आणि शिल्पकार वृत्तपत्राचे संपादक मा.सुरेशदादा गायकवाड,पँथर संघटनेचे प्रदेशषप्रभारी मान.राहुल प्रधान,सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत,कवी,लेखक,टिकाकर,समिक्षक मान.डॉ.प्रकाश मोगले, पूर्णा न प चे गटनेते उत्तम खंदारे,अनिल खर्गखराटे धममदीप जोंधळे,भीमा वाहुळे विजय जोंधळे, कवी उमाजी बरहाटे,रमेश बरकुंटे,प्रभाकर त्रिभुवन ॲड.हर्षवर्धन गायकवाड,डॉ.उत्तम सोनकांबळे,दादाराव पंडित,शामराव जोगदंड,त्रिंबक कांबळे,पत्रकार जगदीश जोगदंड,सय्यद कलीम,कैलाश बलखंडे,अनिल आहिरे,प्रदीप ननावरे, ॲड.महादेव जोगदंड, ॲड. काळे, ॲड.हिरानंद गायकवाड, शिवाजी वेडे,गौतम काळे,सिध्दार्थ भालेराव राहुल धबाले,मोहन लोखंडे,शाहीर गौतम कांबळे मुगजी खंदारे , अब्दुल रहीम प्राचार्य पाटील,डॉ.कापसे,डॉ.संदीप जोंधळे,दिलीप गायकवाड,दिलीप काळे, आदिसह प्रकाश कांबळे यांच्या वर प्रेम करणाऱ्या बहुतांश लोकांनी त्यांचा शाल,पुष्पहार आणि भेटवस्तू देवून सत्कार केला.
तीन तास चाललेल्या या सत्कार सोहळ्यात सुरेशदादा गायकवाड,राहुल प्रधान,डॉ.प्रकाश मोगले,रौफ कुरेशी,उत्तम खंदारे, ॲड.हर्षवर्धन गायकवाड यांनी प्रकाशदादा कांबळे यांच्या कर्तृत्वाची उजळणी केली. व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केल्या.याप्रसंगी बोलताना,सुरेश गायकवाड यांनी भविष्यात डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी लिहिलेल्या राजकीय भूमिका नमूद असणाऱ्या खुल्या पत्राप्रमाने राजकीय वाटचाल व्हावी,असा आशावाद व्यक्त केला.तर डॉ.प्रकाश मोगले यांनी बाबासाहेबांनंतर पन्नास वर्षे पँथर संघटनेने निःस्वार्थ पणे समाजाची सेवा करीत जरब ठेवला,ही काहीं साधी बाब नाही चळवळीतील नेते आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची सेवा करतात तेंव्हा कुठे समाज सुरक्षित राहतो.म्हणून समाजाने निःस्वार्थ नेत्यांचे दुःख जाणले पाहिजे.त्यांना मदत केली पाहिजे.अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात पूर्नेत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांचे संविधान गौरव समितीच्या वतीने पुष्पहार शाल देवून स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात पूज्य भदंत पय्यावंश यांनी उपस्थिताना त्रिसरन पंचशील दिले.तर सुप्रसिद्ध कवी व गायक विजय सतोरे यांच्या सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश जोगदंड यांनी केले तर सूत्र संचलन आणि आभार प्रदर्शन श्रीकांत हिवाळे यांनी केले......
0 टिप्पण्या