🌟परभणीत महागाई विरोधात निदर्शने करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक....!


🌟भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्यातील सरकारमुळे देशात महागाई मोठ्या प्रमाणावर भडकली🌟

परभणी (दि.११ जुलै २०२३) : परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज मंगळवार दि.११ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास वाढत्या महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करणार्‍या राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना नानलपेठ पोलिसांनी अटक केली.

                भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यातील सरकारमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर भडकली आहे. जीवनावश्यक सर्व छोट्या-मोठ्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, असा आरोप करीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश सरचिटणीस अकबर जहांगिर, प्रदेश प्रभारी विनय भानू यांच्यासह माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, अब्दुल सईद, वाजेद जहागिरदार, सत्तार पटेल, अरुण सोंगे, वैजनाथ देवकते, प्रदीप जोंधळे, इरफान शेख, मतीन शेख आदी कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यावर ठाण मांडले. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातात फलके होती. काँग्रेस जणांच्या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक ठप्प झाली, तेव्हा नानलपेठ पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना तेथून अटक केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या