🌟औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील विविध समस्यां बाबत महानगर पालिका आयुक्तांना निवेदन...!


🌟औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने दिले निवेदन🌟


औरंगाबाद (दि.१४ जुलै २०२३) - औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली काल दि.१३ जुलै २०२३ रोजी औरंगाबाद शहरातील विविध समस्यां बाबत महानगर पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.


औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदना महानगर पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवावा. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी,कब्रस्तानात व स्मशानभुमीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी व त्यांना मनपा तर्फे मासिक वेतन देण्यात यावे,शहरामध्ये माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा,औरंगाबाद शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळयांची उंची वाढविण्यात यावी,औरंगाबाद शहरामधील मजनु हिल येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर या हॉलचे भाडे खुप जास्त वाढविल्यामुळे सर्व सामान्य संस्था सामाजिक संघटना नेहमी कार्यकम घेत असतात पण सध्या मनपा कडून हॉलचे पाच पट भाडे वाढविल्यामुळे सामाजिक संघटना व संस्था यांच्यामध्ये तीव्र नाराजी झाली आहे. त्यामुळे पुर्वी प्रमाणे हॉलचे भाडे ५५० रुपये करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली यावेळी असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या