🌟समर्पित भावनेने चळवळीला योगदान देण्याचे काम त्यांनी केले🌟
रिपाईचे ज्येष्ठ नेते पॅंथर चळवळीतील अग्रणी आंबेडकरी व धम्म चळवळीतील निष्ठावान पाईक सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत आदरणीय प्रकाश कांबळे त्यांचं समस्त जीवन आणि कार्य प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहे महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे सर्वोच्च आदर्श या महापुरुषांचे विचार कृती मध्ये आणून काया वाचा मनाने समर्पित भावनेने चळवळीला योगदान देण्याचे काम त्यांनी केलेल आहे.
अगदी विद्यार्थी दशेमध्ये भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेमध्ये त्यांनी एक काम करण्यास सुरुवात केली 70 72 च्या दशकामध्ये पूर्णा शहरांमध्ये समविचारी तरुणांच संघटन त्यांनी निर्माण केलं शालेय जीवनापासून ते अतिशय ते कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी एम ए हिंदी विषयांमध्ये प्राविण्यमध्ये सुयशाने उत्तीर्ण केले त्या काळामध्ये त्यांना विविध उच्च पदस्त नोकऱ्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक चालून आल्या.परंतु त्यांनी पॅंथर चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत लेखक ज.वी. पवार राजा ढाले प्राध्यापक अरुण कांबळे गंगाधर गाडे दिवंगत आमदार टी एम कांबळे आदी पॅंथर चळवळीतील कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्वतःला झोकून दिले.
पूर्णा नगरपालिकेमध्ये 1985 90 च्या दशकामध्ये दलित पँथर या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्यामध्ये आदरणीय प्रकाश कांबळे यांचा मोलाचा वाटा होता ते पूर्णा नगरपालिकेचे पंधरा वर्षे नगरसेवक होते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून जो महाराष्ट्र व्यापी देश व्यापी लढा उभा राहिला मराठवाडा विभागाच समर्थ नेतृत्व त्यांनी केलं. त्यांचं अभ्यासु चळवळीवरील भाश्य विषय मांडनी प्रत्येकाला भावणारी दिशा देणारी असते.
नामांतर चळवळीच्या कालखंडामध्ये त्यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला त्यांच्या व्याख्यानांमधून भाषणा मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला का मिळाले पाहिजे त्याबाबत त्यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासपूर्ण भाषणामधून ते विशद करत.नामांतर चळवळीमध्ये त्यांना कारावास सुद्धा झाला होता पूर्णा शहरामध्ये गेल्या दोन दशकापासून त्यांच्या प्रमुख संयोजना खाली भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन भव्य दिव्य प्रमाणामध्ये केले जाते.
महाराष्ट्र मधील सुप्रसिद्ध विचार वंत संविधानाचे अभ्यासक परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित केले जाते भारतीय संविधान या ग्रंथाचे मोठ्या प्रमाणावर वाटप संविधान गौरव सोहळ्या मधून होत असते संविधान गौरव सोहळ्या मधून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न होताना दिसत आहे पूर्णा शहरातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे दिनांक 10 जुलै हा त्यांचा जन्मदिन पूर्णा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर संकल्प दिन म्हणून साजरा केला जातो.
पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय प्रकाश जी कांबळे (दादा) यांना आयु आरोग्य बल व वैभव प्राप्त होवो. ही मनोकामना. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे त्यांचं आयुष्य प्रकाशमान हो वो ही मनोकामना...!
शुभेच्छुक
प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे
संस्कृती महाविद्यालय पूर्णा.
जी. परभणी.
0 टिप्पण्या