🌟गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा (रु ) येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी.....!


🌟यावेळी पुजेचे यजमान भगवान नागोराव सोळंके सहपत्नीक यांच्या हस्ते पुजा करण्यात आली🌟

गंगाखेड (दि.०३ जुलै २०२३) - गंगाखेड तालुक्यातील मौ.वृंदावन जवळा (रु) येथे गुरुपौर्णिमेची सुरुवात तुळजाभवानी मंदिरामध्ये  होम हवन व मंत्रोपचार ब्राह्मण देवता जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूजेचे यजमान भगवान नागोराव सोळंके सहपत्नीक यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली.  


 
भारतीय संस्कृतीत गुरू परंपरेला विशेष महत्त्व आहे. रामायण, महाभारत पासून ते आधुनिक काळापर्यंत गुरू महिमा अधोरेखित होत आहे. गुरू प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे उत्सवास विशेष महत्त्व आहे. त्यानंतर १२:३०ते १:३० या वेळेमध्ये प प श्री श्री श्री १००८ महंत पद्मनाभानंद गिरी महाराज ( उत्तर अधिकारी ) श्री तुळजाभवानी संस्थान राजगादी राजा टाकळी ता. घनसावंगी जि. जालना यांचे प्रवचन झाले त्यांनी या प्रवचनामध्ये गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असे त्यांनी आपल्या प्रवचनात श्रोत्यांना उपदेश केला. त्यानंतर महाप्रसाद  झाला. या महाप्रसादाचे आयोजन किशन रुस्तुमराव कदम  व भगवान रुस्तुमराव कदम यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या