🌟जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने निवेदनाद्वारे केली मागणी🌟
परभणी (दि.३१ जुलै २०२३) - परभणी जिल्हा काँग्रेस कमेटीने महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व तात्काळ भिडे यांना अटक करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्याकडे केली आहे.
परभणी जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष तथा आ.सुरेशराव वरपुडक यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांची आज सोमवार दि.३१ जुलै २०२३ रोजी भेट घेतली. या भेटीतून संभाजी भिडे यांच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून घ्यावा व भिडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे,महानगर अध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक सुनील देशमुख, अमोल जाधव, नाकसेन भेरजे, सत्तार पटेल,अब्दुल सईद, सुहास पंडित, दिगंबराव खरवडे,प्रदीप सोनवणे, मुंजाभाऊ गायकवाड, अनिल घाटगे, हरिभाऊ घुले,कैलास टेकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते....
0 टिप्पण्या