🌟मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांना समाजभुषण पुरस्कार....!


🌟सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माईसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟


परभणी/पुर्णा (दि.०२ ऑगस्ट २०२३) - परभणी जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पुर्णेतील सामाजिक चळवळीतील धाडसी सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांना त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथे काल मंगळवार दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सन्माननीय सुनबाई माईसाहेब यांच्या हस्ते सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य मान्यवरांच्या साक्षीने समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना मिळालेल्या या समाज भुषण पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे......   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या