🌟देशात 70 सुपरकम्प्युटर इन्स्टॉल करण्याची मंजूरी🌟
✍️ मोहन चौकेकर
नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनला मोठा बूस्ट मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी आणखी 9 सुपरकम्प्युटर मागवण्यासाठी मंजूरी दिली आहे. यासाठी 14,903 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देशातील सुपरकम्प्युटर्सची संख्या वाढणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 साली डिजिटल इंडिया अभियान सुरू केलं होतं. या अभियानामध्येच नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनचाही समावेश होता. देशात 70 सुपरकम्प्युटर इन्स्टॉल करण्याची मंजूरी यामध्ये देण्यात आली होती.
* काय असतात सुपरकम्प्युटर ?
सुपर कम्प्युटर हे साधारण कम्प्युटरच्या तुलनेत अतिशय फास्ट आणि प्रगत असतात. अगदी कठीण कॅल्क्युलेशन किंवा गणिती प्रक्रिया काही सेकंदांमध्येच करण्याची क्षमता यामध्ये असते. क्वांटम मेकॅनिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च, हवामानाची माहिती, मॉलिक्यूलर मॉड्यूलिंग, न्यूक्लिअर फ्युजन रिसर्च आणि मेडिकल रिसर्च अशा कित्येक क्षेत्रांमध्ये याचा फायदा होतो.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या