🌟 चांद्रयान-3 चंद्रावरीलच्या 🌒 लँडिंगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का निवडली....!


🌟जाणून घेऊ या  मागचे खरे व खास कारण🌟

देशाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-3 या मोहिमेकडे लागले आहे. चांद्रयान 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रभूमीला स्पर्श करणार आहे. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाणार आहे. पण तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? चांद्रयान 3 साठी नेमकी 23 ऑगस्ट हीच तारीख का निवडली. तर यामागे एक खास कारण आहे त्या बद्दलची माहिती जाणून घेऊयात

* चांद्रयान चंद्रावर 🌒 उतरण्यासाठी 23 ऑगस्ट ही तारीख का बरे निवडली जाणुन घेऊ या तारखेमागे हे खास व खरे  कारण :-


चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सौरऊर्जेद्वारे त्यांची पुढील प्रक्रिया करतील.चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस प्रकाश असतो. विक्रम लँडर आणि प्रज्ञान दिवसाऐवजी रात्री उतरलं असतं तर काम करणं कठीण झालं असतं.अचूक गणनेनंतर इस्रोचे शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की या तारखेला दक्षिण ध्रुवावर पुरेसा सूर्यप्रकाश असेल. यामुळे केवळ लँडिंग सोपे होणार नाही, तर प्रज्ञान रोव्हर योग्य पद्धतीने काम देखील करू शकेल.22 ऑगस्टपासून चंद्रावर दिवस आहे. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत प्रकाश असेल आणि त्याचा फायदा विक्रम लँडर आणि प्रज्ञानला होईल. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञानला सूर्यापासून ऊर्जा मिळत राहील..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या