🌟प्रहारची जनशक्ती पक्षाची प्रशासनाकडे मागणी🌟
पुर्णा (दि.२३ आगस्ट २०२३) - पुर्णा शहरालगत असणाऱ्या कानडखेड परिसरातील रिलायबल ऍग्रो फुड्स ह्या हड्डी कारखान्यामुळे परिसरात निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जिवित्त्वास धोका निर्माण होत आहे. सदरील ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात दुभत्या गाभन जनावरांची कत्तल होत असून त्याकडे स्थानिक प्रशासन पुर्णपणे दुर्लक्ष करत आहे. सदरील ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने सदरील हड्डी कारखाना तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल व संबंधीत निवेदनाची दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रहार उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख संजय वाघमारे, उप ता. प्रमुख बाभन ढोणे,श्रीहरी इंगोले,सुरेश वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......
0 टिप्पण्या