💥यावेळी विद्यार्थ्यांनी महादेवाची वेशभूषा हुबेहूब साकारत सर्व भावीक भक्तांचे लक्ष वेधून घेतले💥
आज श्रावण सोमवार निमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली शाळेची शैक्षणिक क्षेत्र भेट म्हणून टाळ, मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवच्या जयघोषाने व अभंगाच्या तालावरती सर्वांनी पावलीचा ठेका घेत विद्यार्थी,शिक्षक व मुख्याध्यापक जवळजवळ ७ कि.मी. उंच डोंगरावर वसलेले डोंगरतळा येथील जागृत महादेवाचे स्थान असलेले रमणीय दाट झाडामध्ये लपलेलं जयशंभो मंदीरास अती उत्साही, आनंदाच्या भरात भेट दिली. या श्रावणमासी क्षेत्र भेटीने संपूर्ण परिसर मनमोहक करत श्रीराज मोहन कोद्रे या विद्यार्थ्यांनी महादेवाची वेशभूषा हुबेहूब साकारत सर्व भावीक भक्तांचे लक्ष वेधून घेतले तसेच शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व भावीक भक्तांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर जुमडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ मेनकुदळे,सहशिक्षक भास्कर चव्हाण,परमेश्वर मेनकुदळे,गणेश येलाले, नितीन कुकाले,बर्गे सर ,मनु कोद्रे,कौशल्या नागरगोजे व राधा कोद्रे आदिनी परिश्रम घेतले......
🌹🙏
0 टिप्पण्या