🌟पुर्णा येथील बुद्ध विहारात स्वातंत्र्य दिना निमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न....!


🌟पोलिस निरिक्षक प्रदिपजी काकडे यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहन🌟

पुर्णा : अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पूर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नामदेवराव राजभोज नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे यादवराव भवरे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२३ सकाळी ०८-०० वाजता तिरंगा ध्वजाच ध्वजारोहण करण्यात आले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार समर्पित करण्यात आले.भदंत उपाले थेरो ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी पूर्णा शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उपस्थिताना बुद्ध विहार समितीच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.तसेच बुद्ध विहार प्रांगणामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गायकवाड पी.जी.रणवीर पत्रकार विजय ब गाटे  अमृत मोरे टी. झे ड कांबळे वा रा काळे  गुरुजी मुकुंद पाटील शिवाजी थोरात विजय जोंधळे  ज्ञानोबा जोंधळे मुंजजी  गायकवाड संभाजी गायकवाड साहेबराव सोनवणे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी राम भालेराव सूरज जोंधळे राजू जोंधळे प्रशांत भालेराव व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.सूत्र संचलन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या