🌟परभणी जिल्हा पत्रकार संघाकडून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ परिपत्रकाची होळी...!


🌟राज्याचे मुख्यमंत्री यांना निवासी उप जिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्या मार्फत देण्यात आले निवेदन🌟

परभणी (दि.१७ आगस्ट २०२३) - परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगतीने न्यायालयात चालवणे, पाचोर्‍याचे आ.किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करणे, आदी प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर पत्रकार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने त्याचे निषेध करत होळी करण्यात आली.मुख्यमंत्री यांना निवासी उप जिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. 

मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हा कचेरी समोर या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी होळी करत निषेध नोंदवण्यात आला. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरागामी महाराष्ट्राला भुषणावह नाही, अशा शब्दात तिव्र निषेध करण्यात आला आहे. विविध मागण्यांचे निवेदन परभणी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर राज्य निवडणूक प्रभारी प्राचार्य सुरेश नाईकवाडे, प्रवीण देशपांडे, संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हटेकर, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, जिल्हा उपाध्यक्ष धाराजी भुसारे, महानगराध्यक्ष दत्तात्रय कराळे, कार्याध्यक्ष शिवशंकर सोनवणे, बी.जी.बद्दर, मदन कोल्हे, अकबर सिध्दीकी, डॉ.सुनिल जाधव, पांडुरंग अंबुरे, प्रमोद अंभोरे, माणिक रासवे, संघपाल अडागळे, मंचक खंदारे, प्रसिद्धीप्रमुख सुधाकर श्रीखंडे, दिलीप बनकर, संजय घनसावंत, सुनील सुतारे, शेख अजहर, मंदार कुलकर्णी, सय्यद जमील, नुरोद्दीन सिध्दीकी, भारत कनकुटे, त्र्यंबक खंदारे, राहुल धबाले आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या