🌟नविन शैक्षणीक धोरणानुसार कौशल्यभिमुख उच्च शिक्षणाचा अंगीकार करावा - प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार


🌟स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात चौथ्या पदवी वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते🌟


पुर्णा (दि.२१ आगस्ट २०२३) - येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी नविन शैक्षणीक धोरणानुसार कौशल्यभिमुख उच्च शिक्षणाचा अंगीकार करावा असे प्रतिपादन प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, अधिसभा व विद्यापरिषद सदस्य, विद्यापीठ उपकेंद्र परभणीचे सदस्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले.

 ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचलित स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णाच्या चौथ्या पदवी वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन आवडीच्या क्षेत्रात आपले व्यक्तिमत्व घडवावे कोणत्याही विषयाची पदवी जीवन सुसंस्कृत करण्यासाठी महत्वाचा आधार असते असे त्यांनी यावेळी सांगितले . 

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अधिसभा सदस्य प्रा. डॉ. विजय भोपाळे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा उपयोग जीवन यशस्वी  करण्यासाठी करावा नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होणार असून अशाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, व्यंकटराव कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील नऊ विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रा.सुजाता घन यांनी विद्यापीठ गीताच्या गायनाने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रभारी प्रा. डॉ.मारोती भोसले यांनी मांडले. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ.मारोती भोसले , डॉ.प्रभाकर कीर्तनकार, डॉ. प्रकाश सूर्यवंशी,डॉ. भारत चापके ,डॉ. संतोष कुऱ्हे ,डॉ. संजय कसाब, प्रा. जगन्नाथ टोंपे, डॉ. प्रभाकर किर्तनकार व महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या