🌟परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी अधिकृत वजन काटे वापरावे...!

🌟असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले🌟


 
परभणी (दि.२६ ऑगस्ट, २०२३) : अनाधिकृत वजन काट्याचे सुटे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात शेजारील राज्यातून विक्री केले जात आहेत. त्यामुळे वजन काटे उत्पादक, दुरुस्ती करणारे, विक्रेते आणि ग्राहकांचे नुकसान होत आहे. परिणामी राज्याचा महसूल बुडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व वजन काटे वापरकर्त्या व्यापाऱ्यांनी अधिकृत वजन काटे वापरावेत, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.    

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या