🌟परभणी शहरातील गांधी पार्क परिसरातील सराफा दुकानातून अनोळखी महिलांनी पळवले दीड लाखांचे दागिने....!


🌟नानलपेठ पोलिस स्थानकात सराफा व्यापारी गोविंद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पाच अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल🌟

परभणी (दि.१९ ऑगस्ट २०२३) : परभणी शहरातील गांधी पार्क परिसरातील एका सराफा दुकानात दागिणे खरेदी करण्यासाठी आलेल्या अनोळखी महिलांनी हात चालाखीने सुमारे ०१ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना घडली या घटने संदर्भात दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी नानलपेठ पोलिस स्थानकात सराफा व्यापारी गोविंद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पाच अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           दागिणे लंपास करणार्‍या या महिला शहरातील गांधी पार्कातील गोविंद डहाळे यांच्या सराफा दुकानात दोन वेळा आल्या होत्या. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०१-४५ वाजेच्या सुमारास तर १३ ऑगस्ट २०२३ रोजी ०६-३० वाजेच्या सुमारास दुकानात आल्या होत्या. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास दोन महिला व एक मुलगी दुकानात प्रवेश करते झाली. त्यांनी नाकातली मोरणी खरेदी करण्यासाठी दागिने पाहिले आणि हात चालाखीने त्याचवेळी ९० हजार रुपये किमतीचे २४ नग चोरले त्यानंतर १३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला दुकानात आल्या, त्यांनी खरेदीसाठी काही दागिने पाहिले व हात चालाखीने ६० हजार रुपये किमतीची अंगठी चोरली. असे दिलेल्या तक्रारीत दुकानदार डहाळे यांनी नमूद केले आहे.  सीसीटिव्हीची पाहणी केली असता हा प्रकार पुढे आला. या बाबत नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील तपास सपोनि पुंड करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या