🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणीसह आ.पाटलांवर कारवाई मागणी 🌟
परभणी/पुर्णा (दि.१७ आगस्ट २०२३) - अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज गुरुवार दि.१७ आगस्ट २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील पत्रकारांनी जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा तहसिल कार्यालयात संघटीत होऊन तहसिलदार श्री.बोथीकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.प्रदिपजी काकडे यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरुपात निवेदन पाठवून जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदिप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करीत हल्लाचा सुत्रधार आ.किशोर पाटील याच्यावर कठोर कारवाई करण्याची तसेच राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना जलदगती न्यायालयात चालवण्याची व पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
पुर्णा तहसिल कार्यालयात एकत्रित झालेल्या पत्रकारांनी यावेळी निदर्शने करीत बोधट ठरलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची देखील होळी केली पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यात ०८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे ज्या राज्यात पत्रकार संरक्षणासाठी कायदा लागू झाला परंतु राज्यातील पत्रकारांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही त्यामुळे हा कायदा पुरता कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे.
राज्या मागुल चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले यात मृत्यूच्या देखील घटना झाल्या धमक्या शिविगाळ अपमानीत करण्याच्या देखील घटना सातत्याने घडत आहेत परंतु अश्या घटनांतील केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आल्याने त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्यामुळे या कायद्याची उपयुक्तता संपली त्यामुळे कायद्याची भितीच समाजकंठकांच्या मनात उरली नाही असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यातील ७५ टक्क्यांवरील हल्ले राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांकडूनच झाल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्याकडून प्रथमतः मोबाईलवर शिविगाळ धमकी व त्यानंतर त्यांना आ.पाटील यांच्या गुंड कार्यकर्त्यांकडून अडवून झालेली मारहाण या घटनेत देखील पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा वापर करण्यात आला नाही त्यामुळे या प्रकरणात आ.किशोर पाटील व सहकारी हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाने आज पुर्णा तहसिल कार्यालया समोर बोधट ठरलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी केली.
पुर्णा तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनावर जेष्ठ पत्रकार विजयजी बगाटे,तालुकाध्यक्ष दौलत भोसले,कार्याध्यक्ष मुजीब कुरेशी,सचिव गजानन हिवरे,शहराध्यक्ष केदार पाथरकर,शहर कार्याध्यक्ष मोहन लोखंडे,शहर सचिव मो.अलिम मो.युसूफ यांच्यासह अनिस बाबुमियां,शेख अफसर शेख सत्तार,सतिष टाकळकर,संजय गव्हाणे,सुशिल दळवी,अमृत कऱ्हाळे,अतुल शहाणे,स.कलीम,अनिल आहिरे,कैलास बलखंडे,संपत तेली,सुरेश मगरे,जनार्धन आवरगंड,सचिन सोनकांबळे आदींसह असंख्य पत्रकारांच्या स्वाक्षरी आहेत......
0 टिप्पण्या