🌟वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने महिनाभरात जबरी चोरी व घरफोडीचे २१ गुन्हे आणले उघडकीस...!


🌟घटनेतील १० आरोपींकडून ०९.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत🌟


✍🏻फुलचंद भगत

वाशिम :-नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव सतर्क असून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभरात जबरी चोरी व घरफोडीसह इतर चोरीचे तब्बल २१ गुन्हे उघड केले आहेत. त्यामध्ये १० आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत त्यांच्याकडून  ०९.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

      पो.स्टे.मंगरूळपीर अप.क्र.५२९/२३, अप.क्र.७८/२३ व पो.स्टे.जऊळका अप.क्र.१७८/२३ सर्व कलम ३८० भादंवि प्रमाणे नोंदविण्यात आलेल्या मंदिर चोरीतील गुन्ह्याचा तपास करत असतांना त्यातील निष्पन्न आरोपी नामे रामहरी संदीप लांडकर, रा.किनखेडा, ता.मालेगाव, जि.वाशिम यास अटक करून त्याचेकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याचबरोबर पो.स्टे.मालेगाव अप.क्र.२६६/२३, अप.क्र.३०५/२३ कलम सर्व १३६ वीज अधिनियम मधील आरोपी नामे साहिल मलिक सिराजउद्दीन, आसिफ मलिक सिराजउद्दीन व शाहरुख खान कादरखान पठाण यांचेकडून चोरीतील ६.५ क्विंटल अल्युमिनियम तार हस्तगत करण्यात आली. नंतर पो.स्टे.वाशिम शहर येथे चोरीच्या विविध कलमांन्वये दाखल अप.क्र.२३७/२३, अप.क्र.८१३/२३, अप.क्र.४४७/२३, अप.क्र.२४४/२३, अप.क्र.३३३/२३ या एकूण ०५ गुन्ह्यांमध्ये आरोपी नामे अजय महावीर भुक्तार, रा.सिद्धार्थ नगर, हिंगोली यास अटक करून त्याचेकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर पो.स्टे.वाशिम ग्रामीण अप.क्र.३५०/२३, पो.स्टे.मालेगाव अप.क्र.३७३/२३, पो.स्टे.शिरपूर अप.क्र.२१९/२३ सर्व कलम ३७९ भादंवि प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी नामे गजानन देवराव गव्हाणे, गोलू उर्फ राजू देवराव गव्हाणे,अंकुश देवराव गजबाल, नामदेव देवराव गजबाल यांना अटक करून त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर पो.स्टे.मंगरूळपीर अप.क्र.०४/२३, क.३८० भादंवि मध्ये आरोपी नामे पवन सुरेश पवार, रा.वडद ब्राम्हणी, ता.महागाव, जि.यवतमाळ यास सदर गुन्ह्यात अटक करून तपासादरम्यान त्याने कारंजा, मंगरूळपीर, वाशिम हद्दीमध्ये एकूण ०७ ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. 

     सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, सपोनि.जगदीश बांगर, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.गजानन झगरे, गजानन अवगळे, संतोष कंकाळ, पोना.प्रशांत राजगुरू, गजानन गोटे, अमोल इंगोले, राजेश राठोड, प्रवीण राऊत, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, महेश वानखेडे, पोकॉ.निलेश इंगळे, विठ्ठल महाले, दीपक घुगे, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पार पाडली...


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या