🌟नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष देईल का ? अबालवृध्द शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनींमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत🌟
✍🏻पत्रकार मोईन कादरी - वसमत
वसमत (दि.२७ आगस्ट २०२३) - वसमत शहरात मोकाट कुत्र्नी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसत असून काल शनिवार दि.२६ आगस्ट २०२३ रोजी वसमत शहरातील कारखाना रोडवर ५० ते ६० मोकाट कुत्र्यांच्या टोळीने तब्बल नऊ ते दहा लोकांवर हल्ला करूण जखमी केले शहरातील कारखाना रोड येथे लकी हॉटेल ते कारखाना रोड पर्यंत मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत असल्याने या भागात प्रचंड भितीचे वातावरण पसरलेले होते.
वसमत शहरातील अनेक ठिकाणी मोकाट व पिसाळलेले कुत्रे धुमाकूळ घालत असून या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या जुने बस स्टॅन्ड ते नवीन बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन,झेंडा चौक,मामा चौक,सरकारी दवाखान्यासमोर शिवनेरी नगर निमरा कॉलनी अग्रवाल कॉलनी पोलीस स्टेशन परिसरात दिलेल त्याचा चावा घेऊन नागरिकांना सळो की पळो करून सोडत आहेत मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलेल्या लोकांमध्ये गंगाधर जाधव रेनकापुर,गंगाप्रसाद धोंडीबा असेगाव कॉर्नर,प्रभाकर मोराळे,सिद्धार्थ सूर्यतळ,मुन्नी बी शेख शफी,प्रणोल त्रिंबक मैकर,संबोधी राहुल चितळे,जावेद फारोकी यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शासकीय उप जिल्हा रूग्णालयात इंजेक्शन उपलब्द नसल्याने चावा घेतलेल्या इसमांना उपचारासाठी नांदेडला जावे लागत आहे.
सदरील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांवर पशुवैदयकीय विभागा मार्फत उपचार करण्याची गरज आहे नगर परिषद प्रशासनाने या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांवर योग्य ती कार्यवाही करूण नागरीकांना विनाकारण चावनाऱ्या मोकाट कुत्र्या पासुन बचाव करण्याच्या दृष्टीने कठोर पाऊल उचलावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.....
0 टिप्पण्या