🌟क्रिडाक्षेत्रातील करिअर मार्गदर्शन🌟
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - पूर्वीच्या काळी क्रीडाक्षेत्रात खेळाडू,प्रशिक्षक,संघटक ऐवढ्यापुरतेच विश्व होते.परंतु आता क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध क्रीडाशिक्षक शिवकुमार निर्मळे यांनी केले.
पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात दि.२६ ऑगस्ट २०२३ शनिवार रोजी 'क्रीडा क्षेत्रातील करिअर' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निर्मळे बोलत होते विद्यार्थ्यांसाठी 'करिअरच्या अनेक वाटा' या उपक्रमांतर्गत क्रीडाविभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या मार्गदर्शन सत्रात विद्यालयाचे मुख्यध्यपक संजयराव विभूते,क्रीडा शिक्षक ज्ञानेश मातेकर उपस्थित होते.
क्रीडाक्षेत्रातील करिअर या बाबत अधिक माहिती देताना निर्मळे म्हणाले की,करिअरची व्याप्ती आता इतकी मोठी झाली आहे की सध्या खेळ फक्त वेळ घालवायचे साधन राहिले नाही तर त्यात अनेक करिअर लपलेली आहेत.या क्षेत्रात व्यावसायिक संधी आहेत तसेच वार्षिक निकालात खेळाचे वाढीव गुण प्राप्त होतात.सैन्यदल,रेल्वे विभाग,पोलीस विभाग,शासकीय कार्यालय,बँक इ.क्षेत्रात नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप कौशल्य आहे.मेहनत,जिद्द,सराव या बळावर या भागातील विद्यार्थी देखील तालुकपातळी पासून राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतो. शालेय जीवनापासूनच विविध खेळात विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन भावी काळात क्रीडा क्षेत्रात करिअर करावे.
समारोपात मुख्याध्यापक विभूते यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाला सर्वाधिक महत्त्व आहे. शरीर समृद्धी साठी संतुलित आहार आणि नियमित खेळ खेळणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी खेळा साठी अधिकचा वेळ काढला पाहिजे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमात सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी यांनी सहभाग घेतला......
0 टिप्पण्या