🌟मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले🌟
परभणी (दि.२२ आगस्ट २०२३) : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ओबीसी समाजातील खंबीर नेतृत्व रामकिशन रौंदळे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपाचे डॉ. सुभाष कदम यांची उपस्थिती होती. रौंदळे यांनी यापूर्वी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता पक्षाने त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.....
0 टिप्पण्या