🌟पुर्णेतील कै.राजाराम बापू सभागृहात दोन दिवसीय 'दिव्यांग पूर्वतपासणी व नावनोंदणी शिबीराचे' उद्घाटन संपन्न🌟
परभणी/पुर्णा (दि.१५ आगस्ट २०२३) - गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान व शासकीय योजना मदत केंद्र यांच्या वतीने पूर्णा येथील राजाराम बापू सभागृहात आयोजित केलेल्या दोन दिवसीय 'दिव्यांग पूर्वतपासणी व नावनोंदणी शिबीराचे' उद्घाटन लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात हजारों दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली होती. त्यांची तपासणी आणि नोंदणी करण्यात आली आहे. पुढे त्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक ते साहित्य देण्यात येणार आहे. तसेच त्यांना शासकीय लाभ व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, तालुका अध्यक्ष गणेश कदम, गटविकास अधिकारी मयुर आदिलवाड, नपचे मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज पौळ, समाज कल्याण विभागाचे प्रकाश पेडगावकर, किशन देशमुख, जिल्हा समन्वयक विष्णु वैरागड, संदीप माटेगावकर,शहाजी देसाई, नवनाथ भुसारे, बाळासाहेब कदम,दत्तराव पोळ,मारुती मोहिते, शेख इस्माईल, मुकुंद भोळे, विश्वनाथ होळकर, घाटोळ मामा,डॉ.संकेत डेरवनकर, डॉ.निहंश मेहता, डॉ.क्षितीज निरमल, जयपूर फुट टेक्निशियनचे नसिम खान यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळ व राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या