🌟परभणी जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 1.4 मिलिमीटर पावसाची नोंद....!


🌟जिल्ह्यातील सेलू,मानवत,जिंतूत आणि पाथरी तालुके पावसाअभावी राहिले कोरडे🌟  

परभणी (दि.५ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी केवळ १.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस गंगाखेड तालुक्यात (६.४ मिमी.) झाला असून, त्याखालोखाल पालम (५.६ मिमी), परभणी (१.२ मिमी) झाला आहे. याशिवाय पुर्णा (०.३ मिमी) आणि सोनपेठ (०.१) पावसाने हजेरी लावली.  सेलू, मानवत, जिंतूत आणि पाथरी तालुके पावसाअभावी कोरडे राहिले आहेत. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही ७.४ मिमी राहिली आहे.....   

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या