🌟परभणी जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 1.4 मिलिमीटर पावसाची नोंद....!



🌟जिल्ह्यातील सोनपेठ तालुका पावसाअभावी कोरडा राहिला🌟

परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३): जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी केवळ १.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस मानवत तालुक्यात (२.४ मि.मी.) झाला असून, त्याखालोखाल सेलू (२.१मिमी), जिंतूर (१.९ मिमी) झाला आहे. याशिवाय पुर्णा (१.६मिमी) आणि परभणी (१.३) तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पालम (१.२), पाथरी (०.६), गंगाखेड (०.२) मि.मी. पाऊस पडला तर सोनपेठ तालुका पावसाअभावी कोरडा राहिला. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही २.६ मिमी राहिली आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या