🌟इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा🌟
फुलचंद भगत
वाशिम : केन्द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी सन 2024 - 25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आले आहे. जे विद्यार्थी जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा. ते विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.
ज्या विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 1 जुन 2007 ते 31 जुलै 2009 दरम्यान झाला आहे. असे विद्यार्थी इयत्ता 11 वीच्या प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी तसेच परिक्षेचे स्वरुप व इतर विस्तृत माहिती नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिलेल्या संकेत स्थळावरुन विनामुल्य भरण्यास सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2023 आहे.इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वीची निवड चाचणी परिक्षा 10 फेब्रुवारी 2024 ला घेण्यात येणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या