(पुर्णा येथील विद्याप्रसारिणी शाळेचे क्रिडा शिक्षक राष्ट्रीय आदर्श क्रिडा पुरस्कार सज्जन जैस्वाल यांना देतांना अध्यक्ष डी.एस.तांडेकर,अरुण राऊत,सुमेधा कांबळे व लखनऊ माझी शिक्षण मंत्री डि.एस.वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला)
🌟नागपूर येथे समता साहित्य अकॅडमीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला🌟
समता साहित्य अकॅडमी यांच्या वतीने दिनांक 17/09/2023 रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष समता अकॅडमी चे राष्ट्रीय अध्यक्ष डी एस तांडेकर तसेच समता साहित्य विभागाचे अध्यक्ष अरुण राऊत सर तसेच नागपूर साहित्य अकॅडमीचे आयोजक सुमेधा कांबळे व लखनऊ माझी शिक्षण मंत्री डी एस वर्मा यांच्या हस्ते नागपूर येथे हॉटेल द्वारकामाई येथे आदर्श राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सज्जन हिरालाल जयस्वाल विद्या प्रसारिणी सभा पूर्णा यांना सन्मान चिन्ह,शाल व राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
गेल्या वीस वर्षापासून सतत क्रीडा साठी आहो रात्र धडपड करणाऱ्या क्रीडा शिक्षक म्हणून उदयास आलेले क्रीडाशिक्षक जयस्वाल सर यांनी लंगडी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले तसेच राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत सतत तीन वर्ष महाराष्ट्राचे नाव प्रथम क्रमांकावर ठेवले अनेक राष्ट्रीय खेळाडू लंगडी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले तसेच ॲथलेटिक्स मध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले त्याचप्रमाणे कबड्डी स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू घडवले अनेक खेळाडू घडविले तसेच कॅरम स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडवले त्याचप्रमाणे सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू घडविले अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे याची दखल दखल घेऊन समता साहित्य अकॅडमी यांनी दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय क्रीडा आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला हा कार्यक्रम नागपूर येथे 17 सप्टेंबर 2023 रोजी हॉटेल द्वारका माय येथे संपन्न झाला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सर्व संस्थेचे अध्यक्ष डी आर वाघमारे भीमरावजी कदम श्री निवासजी काबरा विजयकुमार रुद्रवार उत्तमराव कदम साहेबराव कदम बी बी मोरे रणमाळ साहेब उमाटे सर आतिया मॅडम एस आर हिंगणे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी सर्व क्रीडा शिक्षक मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.....
0 टिप्पण्या