🌟मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव.....!


🌟राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रीअतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम🌟

 परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३): मराठवाडा मुक्तिजसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव दिनी उद्या, रविवारी (दि.१७) राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या मुख्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

 मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. तर सायंकाळी ७ वाजता मराठवाड्याची लोकधारा व सांस्कृतिक कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होईल. यामध्ये गीतगायन, पोवाडा आणि भारुड आदींचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

 तत्पूर्वी १३ सप्टेंबरपासून राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सुरू झाली असून, ही स्पर्धा दोन गटात १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या गटात ६ ते १८ वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होतील. तर दुसरा गट १८ पासून पुढे राहणार असून, यामध्ये बालविवाह –एक सामाजिक कलंक, बालविवाह –बालकांच्या विकासातील अडथळा आणि मराठवाड्यातील बालविवाह कारणे व उपाययोजना या विषयांवर आधारित राहणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रम व स्पर्धेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या