🌟मराठवाडयात दुष्काळ जाहीर करा : मंत्री मंडळावर रिपाई (डेमॉक्रॅटिक) चा हल्लाबोल मोर्चा.....!


🌟मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर मागण्यांचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर🌟 


मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे नुकतीच मंत्री मंडळाची बैठक झाली.या बैठकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमॉक्रॅटिक) औरंगाबाद शहर कार्यकारिणीच्या वतीने प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. व मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले.ज्यात प्रामुख्याने मराठवाड्यावर पाणी प्रश्नी झालेला अन्याय दूर करावा.मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत व मराठवाड्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे उभे राहणार नाहीत.व मुंबई पुण्याकडे जाणारा सुशिक्षित बेरोजगारांचा लोंढाही थांबणार नाही.त्यामुळे मंत्री मंडळाने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा त्वरित निर्णय घ्यावा.अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.मराठवाड्यातील विविध धरणात येणारे पाणी पाच्छिम महाराष्ट्रात रोकल्याने मराठवाड्यावर आणि पर्यायाने येथील शेतकऱ्यांवर घोर अन्याय झाला आहे.असा आरोपही करण्यात आला आहे.


राज्यातील अतिक्रमनित गायरान जमिनी वहिती करणारांच्या नावे करण्यात याव्यात.घरासाठी लागनाऱ्या रेती, विटा, गजाली ,सिमेंट आदीसह मजुरीचे दर प्रचंड वाढल्याने  रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात दहा लाख रुपये वाढ करण्यात यावी.यासह मराठवाड्यातील सर्व पाणी प्रकल्पात पाणी सोडून मराठवाड्यातील सिंचन वाढविण्यात यावे.तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना विनाअट दहा लाख रुपये अनुदान देण्यात यावे.मराठवाड्यातील २७ लाख बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी मराठवाडयात नवीन उद्योग निर्माण करण्यात यावेत.या प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

   या निवेदनावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश कांबळे,प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड,नगरसेवक कैलाश गायकवाड,के. व्ही.गायकवाड,नगरसेवक जयभाये,गौतम काळे,शाहीर गौतम कांबळे,आदि सह शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या