🌟दररोज पाचशेच्या वर रूग्न तपासणीचा आकडा🌟
फुलचंद भगत
वाशिम (दि.२१ सप्टेंबर २०२३) :- मंगरुळपीर येथील ग्रामीण रूग्नालय सतत रूग्नांच्या सेवेसाठी कटिबध्द असुन सर्व विभाग हायटेक बनले तसेच प्रत्येक रूग्नांना दर्जेदार आरोग्य सुविधा ऊपलब्ध करुन दिल्या जात आहे.दररोज पाचशेच्या वर रूग्नतपासणीचा आकडा जात असुन सर्वसामान्यासह सर्व परिस्थीतितील आणी सर्व आजाराने बाधित रूग्न शाश्वत ऊपचारासाठी मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयात ऊपचारासाठी येत आहेत.अत्यावश्यक आणी इमरजंशी वगळता 'रेफर टु अकोला आॅर वाशिम' ही बाब राहीली नसुन आपल्या अनुभव आणी कसोशीने सर्व रुग्नांवर तिथेच ऊपचार करुन आजारातुन मूक्त केल्या जात असल्याने नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सकांची जबाबदारी घेतलेले डाॅ.अनिल कावरखे आणी डाॅ.श्रिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयाची सर्व टिम सर्व रूग्नांना दर्जेदार रूग्नसेवा ऊपलब्ध करुन देत आहे.
महाराष्ट शासनाने १५ आॅगष्ट २०२३ पासुन सरकारी रूग्नालयात मोफत ऊपचार पध्दती ऊपलब्ध केल्यामुळे ऊपचारासाठी ग्रामीण रूग्नालयाकडे रूग्नांचा कल वाढला आहे.मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयास तालुक्यातील ११५ खेडे गावं आणी एक मंगरुळपीर शहर जोडल्या गेल्यामुळे ग्रामिण रूग्नालयात प्रचंड कामाचा बोझा वाढला.तसे पाहता मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयात डाॅक्टर,नर्स आणी इतर कर्मचारी संख्या आवश्यकतेपेक्षा खुप कमी असुनही ऊपलब्ध असलेल्या टिमलाच जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अनिल कावरखे आणी मंगरुळपीर ग्रा.रुग्नालयाचे डाॅ.श्रीकांत जाधव हे सतत मार्गदर्शन करुन रूग्नांना सर्व प्रकारची चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा ऊपलब्ध होत असल्यामुळे मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयातील कार्यरत सर्व टिमचे मंगरुळपीर तालुका व शहरातील नागरीकांकडुन कौतुक होत आहे.
* नविन इमारतीत प्रसुतीगृह सुसज्ज इमारतीत प्रारंभ :-
मंगरुळपीर ग्रामीण रुग्नालयात दि.१९/०९/२०२३ पासुन नविन इमारतीत नव्याने सुसज्ज अद्यावत असे सर्व सोईसुविधायुक्त तसेच तज्ञ डाॅक्टर,नर्सेसच्या टिमसह २४x७तास सेवेत गोरगरीबांसह सर्वांसाठी गरोदर मातांच्या प्रसुतीकरीता ऊपलब्ध असुन त्यांचा गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्दकीय अधिक्षक डाॅ.श्रिकांत जाधव यांनी केले आहे....
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या