🌟असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे🌟
🌟राज्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत वैयक्तिक शेततळेधारक लाभार्थी संख्या 43🌟
परभणी (दि.१२ सप्टेंबर २०२३) : राज्याच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही कृषी विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा फळबागधारक शेतकऱ्यांनी यापूर्वी लाभ घेतला नसेल, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून ग्राहक सुविधा केंद्रामार्फत किंवा ऑनलाईन अर्जाद्वारे वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर 2022 पासून कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 43 शेततळे पूर्ण झाले असून, सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंडकाळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पीके तसेच फळबागाच्या संरक्षित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
राज्याची सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचविण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहीर व कुपनलिका तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तिरीकरणाशिवाय शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. सदर योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी 1 लक्ष 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान जिल्हास्तरावर काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. वैयक्तिक शेततळे योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या