🌟विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा जागृत व्हाव्यात या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन🌟
पुर्णा (प्रतिनिधी) - येथील श्री.गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विषाणूजन्य रोगांवर आधारित रांगोळी स्पर्धा आयोजित केली गेली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा जागृत व्हाव्यात या उद्देशाने आयोजित केलेल्या सदर रांगोळी स्पर्धेत बी.एससी. प्रथम,द्वितीय आणि तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कोरोना व्हायरस, चिकन पॉक्स व्हायरस, बॅक्टरीओफाज, एचआयव्ही व्हायरस, टोबॅको मोजाईक व्हायरस, ऐनवेलोपेड वायरस अश्या विविध विषाणू च्या प्रतिकृती विद्यार्थ्यानी रांगोळ्यातून काढल्या. यात श्रुती परजाणे,गरुड संध्या, मंजुषा कांबळे, संजीवनी धूतराज, उर्मिला रसाळ, कदम राजश्री, अंकिता बागल, गर्क आकांक्षा यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी रांगोळी काढण्यासाठी पुस्तकांचा आणि इंटरनेटचा वापर केला. सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दैवशला कामठाणे यांनी प्रस्तावना केली. श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी सदरील रांगोळ्या पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राध्यापिका कमठाने डी.सी. आणि प्राध्यापक राख आर. आर. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. संजय दळवी यांनी परीक्षक म्हणून काम केले. आकांक्षा गर्ग हिने सर्वांचे आभार व्यक्त केले.....
0 टिप्पण्या