🌟शेती साठी सोडलेले जायकवाडीचे पाणी दादागिरी करत गोदा पात्रात वळवले : प्रशासनाची आळिमिळी गुपचिळी....!


🌟आष्टी तालुक्यातील लोणी सीआरचे पाणी चोरी करत काही गावगुंडांनी गोदावरी नदीपात्रात वळवल्याचे चित्रीकरण व्हायरल🌟 


पाथरी (दि.२० सप्टेंबर २०२३) :- जायकवाडी धरणातुन डाव्या कालव्याद्वारे ०१ सप्टेबर रोजी पंचविस दिवसासाठी खरीपाच्या पिकांसाठी पाणी पाळी सोडण्यात आली. मात्र हे पाणी कुंभारपिंपळगाव येथे मुख्य कालव्यात तीन दरवाजे बंद करून आडवण्यात आल्याचे चित्रिकरण शेतक-यांनी सोशल मिडियात व्हायरल केल्याचा परिणाम म्हणून खासदार जाधव यांनी जायकवाडीच्या कार्यकारी अभियंत्याची चांगलीच कानउघडणी केल्या नंतर हे पाणी पाथरी कडे झेपावले. त्या नंतर पुन्हा जालना जिल्ह्यात एक सांडवा (एसकेएफ) सोडून दिला तर आष्टी तालुक्यातील लोणी सीआर चे पाणी चोरी करत काही गावगुंडांनी गोदावरी नदी पात्रात वळवल्याचे चित्रिकरण बुधवारी सोशल मिडियात व्हायरल झाल्याने. या पाण्या साठी जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी कसे ढिसाळ नियोजन करतात ही बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.

परभणी जिल्ह्या कडे येणारे जायकवाडी चे पाणी कुंभार पिंपळगाव ला तब्बल सहा दिवस अडऊन ठेवले होते. हे पाणी कसे तरी सोडले असता पाथरी तालुक्यातील शेतक-यांची मागणी असतांनाही अधिकारी वरतुन पाणी वाढऊन मागत नव्हते. गावागावातुन निवेदने गेल्या नंतर वाढीव पाण्याची मागणी झाली.शिवसेनेने ही शेतक-यांची बाजू लाऊन धरली. परिणामी १ हजार क्युसेक ने डाव्या कालव्यातुन विसर्ग चालू झाला. हे पाणी १६ सप्टेबर रोजी बी ५९ चारीत आले मात्र हे पाणी औट घटकेचेच ठरले. पुन्हा जालना जिल्ह्यात आष्टी तालुक्यात लोणी सीआर वर काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसवत हे पाणी गोदावरी नदी पात्रात वळवण्यात आले असल्याचे चित्रिकरण शेतकरी पुत्रांनी पुन्हा सोशल मिडियात शेअर केले आणि पाणी चोरीचे पितळ उघडे पडले. या विषयी अधिका-यांना विचारणा केली असता या विषयी माहिती घेऊन कार्यवाही करू असे मोघम उत्तर मिळाले. मात्र ठोस अशी कोणती कृती करणार हे मात्र सांगितले नाही. पाथरी तालुक्यात जायकवाडीच्या पाण्या साठी पिकां सह शेतकरी तडफतायत अधिका-यांना पाण्या विषयी विचारणा केली असता पाणी वाढून येणार एवढच सांगतात. मात्र वाढून आलेले पाणी मध्येच चोरी होत असल्याचे यांना माहित कसे होत नाही? का हे सर्व संगनमत करून होत आहे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. इकडे पाणी आले आणि कमी झाले. शेतकरी पाण्या साठी लाठ्या काठ्या करत असल्याचे सांगितले जात आहे. यात कोणाचे बरे वाईट झालेतर त्याचा दोष जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या नियोजन शुन्य कारभारालाच द्यावा लागणार आहे. आता डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक प्रती सेकंद विसर्ग सुरू असतांना इकडे चारी मात्र कोरडी आहे. याला कसले नियोजन म्हणावे असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या विषयी आता जायकवाडी च्या पाथरी येथील उपविभागिय कार्यालयाला शेतक-यांच्या रोशाचा सामना करावा लागलातर कोणालाच नवल वाटणार नाही. कारण संयमाचा ही अंत असतो अशा प्रतिक्रीया आता शेतकरी बांधव सोशल मिडियातून आणि जाहिर पणे व्यक्त करत जायकवाडी पाटबंधारे विभावर आपला संताप व्यक्त करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या