🌟मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव : मराठवाडा स्फूतिगीतांच्या काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध....!

 


🌟मराठवाड्यावरील स्फूर्तीगीतांच्या काव्यवाचनाने उपस्थित रसिक यावेळी मंत्रमुग्ध झाले🌟 

परभणी, दि. १५ (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित येथील बी. रघुनाथ सभागृहात गुरुवारी रात्री काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. मराठवाड्यावरील स्फूर्तीगीतांच्या काव्यवाचनाने उपस्थित रसिक यावेळी मंत्रमुग्ध झाले. 


जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, शिक्षण अधिकारी गणेश शिंदे यांनी सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ व कविवर्य बी. रघुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

व्यासपीठावर निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महापालिकेचे उपायुक्त जयवंत सोनवणे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी नीळकंठ पांचगे, उपायुक्त गग्गड, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सरोज देशपांडे, गिरीश क-हाडे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, अर्चना डावरे, इतर सुप्रसिद्ध कवि-कवयित्री व मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची ‘मोगलाई धमाल’ या अनंत उमरीकर लिखित आणि किशोर पुराणिक अभिनीत एकपात्री नाटकाने सुरुवात झाली. किशोर पुराणिक यांनी निजामी राजवटीतील प्रशासनातील व्यंग्यात्मक बारकावे एकपात्री अभिनयातून सादर करत उपस्थितांमध्ये हशा पिकला. मराठवाडा मुक्तिसंग्रामावेळचा लढा शब्दबद्ध आणि काव्यबद्ध करताना उदय वायकर आणि त्यांच्या चमूने निजामकालीन स्वातंत्र्यसैनकिांचा इतिहास उपस्थितांच्या डोळ्यासमोर जीवंत उभा केला. 

यावेळी उपस्थित साहित्यिक, कवी व कलाकार यांचा सन्मान चिन्ह देवून महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्तियार पठाण व अबोली जोशी यांनी केले. सरोज देशपांडे यांनी कथा वाचन सादर केले, तर नीलकंठ भुचांगे, महेश देशमुख, वत्सला पाटील, रवी कात्नेश्वरकर, मधुरा उमरीकर, भानुदास भोकरे, अनुराधा वायकोस, आदिती मुंजे, सुरेश हिवाळे, त्र्यंबक वडस्कर, हनुमान व्हरगुळे, यशवंत मकरंद, श्रीमती काजे, क्रांति दैठणकर, सुवर्णा गुळजकर, शारदा वानखेडे, नीळकंठ पाचंगे यांनी कविता सादर केल्या. आभार प्रदर्शन प्रकाश बाराबिंड यांनी केले.   

कार्यक्रम यशस्वीतेकरिता रमाकांत कुलकर्णी, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, प्रकाश बाराबिंड, माणिक पुरी तसेच महानगरपालिकेचे सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, रामेश्वर कुलकर्णी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या