🌟परभणी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा धर्मभुमी वृत्तपत्राचे संपादक मदन बापू कोल्हे यांचा सन्मान....!


🌟लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟

परभणी (दि.११ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रातील अत्यंत निर्मळ मनाचे मनमिळावू प्रेमळ व्यक्तीमत्व तथा जेष्ठ पत्रकार व धर्मभुमी वृत्तपत्राचे संपादक मा.श्री.मदन बापू कोल्हे यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून नुकताच सत्कार करण्यात आला.


परभणी जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रांत मागील सहा दशकापासून सायकलवर भ्रमन करीत कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार तथा धर्मभुमी वृत्तपत्राचे संपादक मदन बापू कोल्हे यांनी सतत जनहीतवादी पत्रकारीता केली अत्यंत निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीचे संबंध निर्माण केले इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल दिल्ली या संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष असलेल्या मदन बापू कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते परभणी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला यापुर्वी त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण राज्यस्तरीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार व मानपत्रांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे.

या सत्कार प्रसंगी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ.चंद्रकांत गांगुर्डे,जेष्ठ पत्रकार तथा पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर,पत्रकार तथा मा.विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे आदींसह असंख्य मान्यवर पतूरकारांची उपस्थिती होती.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या