🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगावात राजे संभाजी गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम : मंडळांच्या वतीने मोफत दंत्तरोग तपासणी...!


🌟राजे संभाजी गणेश मंडळाकडून आयोजित दंत्तरोग तपासणी शिबिरात ७० ते ८० दंत रुग्णांनी केली तपासणी🌟


 
पुर्णा (दि.२६ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यांतील पुर्णा-ताडकळस मार्गावर असलेल्या फुकटगाव येथील छत्रपती राजे संभाजी गणेश मंडळाने यावर्षी अत्यंत कौतुकास्पद व एक वेगळा उपक्रम राबवत गणेश मंडळांच्या वतीने आज मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी गाव परिसरातील नागरिकांना दंत्तरोग संदर्भातील आजाराच्या तपासणी साठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये याकरिता दंत्तरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


फुकटगाव येथील राजे संभाजी गणेश मंडळांच्या वतीने आयोजित दंत्तरोग तपासणी शिबिरास ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी दंतरोग तज्ञ ड्रॉ.सौ.छाया दशरथ थोरात यांनी तब्बल ७० ते ८० दंत रुग्णांसह शाळकरी विद्यार्थी/विद्यार्थिनींनीची तपासणी केली या वेळी त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले या दंत्तरोग शिबिरास सौ.भाग्यश्री योगेश खंदारे,योगेश खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दंतरोग तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी बापूराव देविदास बोकारे यांनी पुढाकार घेतला तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे संभाजी पौळ,रघुनाथ बोकारे,विष्णू बोकारे,गंगाधर बोकारे,भागवत बोकारे,बबन बोकारे,शेषेराव बोकारे व अंगणवाडी सेविका या मान्यवरांच्या हस्ते स्वागत करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या