🌟मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार🌟
परभणी (दि.१५ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी रविवारी पाथरी येथे दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०७:३० वाजता प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘पीएम रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पुरुष व महिला गटात प्रथम,द्वितीय व तृत्तीय येणाऱ्या स्पर्धकास पारितोषिक तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी पाथरी येथील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील तसेच इतर आस्थापना, जनता, प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमाकांत उनावणे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या