🌟कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रखर विरोध....!


🌟वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न🌟

फुलचंद भगत

वाशिम:-राज्य शासनाने नुकताच कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा  घेतलेला निर्णय हा अन्यायकारक असून तो निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा,यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करुन शासन निर्णयाचा प्रखर विरोध केला. 

दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे आणी माधवरावजी अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांना लेखी निवेदन दिले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत काळे यांनी  या आंदोलनाचे नेतृत्व केले. रा.कॉ.युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे धरुन नोकर भरतीचा शासन निर्णय किती अन्यायकारक आहे. हे  आंदोलना दरम्यान नारेबाजी करुन  शासनाचा तिव्र निषेध केला. युवकांचे भविष्य अंधारामध्ये ढकलणारा अध्यादेश असल्याने  या अध्यादेशाचा  बेरोजगार युवकांनी देखिल राष्ट्रवादीच्या आंदोलनात सहभागी होवून  निषेध नोंदविला. राज्य शासनाने नोकर भरतीचा जीआर त्वरीत रद्द न  केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा बाबाराव खडसे यांनी यावेळी बोलतांना दिला.

आंदोलनामध्ये  रा.कॉ. जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, रा.यु. कॉ.जिल्हाध्यक्ष अनंत काळे, महिला जिल्हाध्यक्ष  वैशाली मेश्राम,माधवराव अंभोरे, सुनिल पाटील,रमेश गोटे, भगवान शिंदे, बाबाराव टोपले, रा.यु.कॉ.उपाध्यक्ष राजेश्वर गायकवाड, गोपाल भुसारी, विजय घोडे, राधेशाम गव्हाणे,किशोर मोटे, श्रीपाद देशमुख,हाजी इम्रानभाई फकिरावाले, प्रविण काळे,विठ्ठल गायकवाड, सुधाकर भुसारे, डिंगाबर मापारी, इरफानभाई शेख, विशाल धानोरकर, विजय नवघरे,केशव पांडूरग ठाकरे, विशाल पाटील भोयर, श्रीकांत चारखोर,रा.यु.कॉ.शहर अध्यक्ष अजय मोतेवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

****************************************

🌟एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर तर दुसरीकडे महागाईचा भस्मासूर - महेबुब शेख 

 एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षीत तरुण वर्गाला काम मिळत नाही म्हणुन ते रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देवु शकत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची फसवणुक आहे. महागाई,नापीकी अश्या दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे.? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या