🌟पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी🌟
सोलापूर (प्रतिनिधी ) माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ बातमी च्या माद्यमातून लोकशाही वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता या बाबत मुंबई पोलिसांनी लोकशाही वृत्त वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्या वर गुन्हे दाखल केले आहेत या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ पाठीमागे घ्यावेतअशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
🌟बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? यशवंत पवार यांचा राज्यसरकार ला संतप्त सवाल
महाराष्ट्र राज्यात हल्ली बातमी लावण्यवरून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? असा संतप्त सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकार ला विचारला असून बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्र ला शोभणारी नसून अश्या गुन्ह्यामुळे राज्यातील संपूर्ण पत्रकारिता धोक्यात येण्याची भीती यशवंत पवार यांनी व्यक्त केली असून लोकशाही चा चौथा स्तंभ आज धोक्यात आल्याची खंत देखील व्यक्त केली आहे लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करून दाखल करण्यात आलेले गुन्हे पाठीमागे घेण्याची मागणी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.....
0 टिप्पण्या