🌟चला आपण धाब्यावर जाऊ.....!


🌟शेतकरी आत्महत्या भागात,दौऱ्यावर कधी जाऊ या ? ते म्हणाले सांगा,जेवणाची ऑर्डर काय देऊ या  ?🌟

✍🏻कवी : हेरंब कुलकर्णी

मी त्यांना म्हणालो 

 पाण्यात तरंगणारे तुमचे

 नागपूर शहर आपण पाहू


ते म्हणाले 

नको नको,

 त्यापेक्षा आपण,

 धाब्यावरच जाऊ.....!!!


धाब्यावर जाताच, मी म्हणालो-

 दारू दुकाने वाढवण्याची,

निषेधार्ह बातमी दाखवू का ? 

ते म्हणाले " हवी ती चव

आत्ता तुम्हाला चाखवू का ?" 


मी विचारले सहजपणे ,

समृध्दी महामार्गावर, 

अपघात का बरे वाढले ?

प्रश्न दाबायला त्यांनी मग

पाकीटच बाहेर काढले .....


न्यायमूर्ती लोया नागपुरात,

 नेमके कशाने वारले ?

उत्तर म्हणून त्यांनी,

 समोर मेन्यू कार्ड धरले ...


शेतकरी आत्महत्या भागात,

 दौऱ्यावर कधी जाऊ या ?

ते म्हणाले सांगा , 

जेवणाची ऑर्डर काय देऊ या  ?


मी विचारले कंटाळून,

 अच्छे दिन आता

सांगा ना कधी येणार ?

ते म्हणाले सांगा आधी,

 तुम्ही गिफ्ट काय घेणार ?


कंटाळून विचारले शेवटी मी - 


९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची

 रोपटी आता कधी वाढायची ?

त्यांनी विचारले,

 पत्रकारांची

 ताडोबात ट्रीप कधी काढायची ?


आजूबाजूला सगळे मद्यपी बघत

आम्ही धाब्यावरून निघत होतो..

 सत्तेची नशा करते, किती बेधुंद 

हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..


कवी : हेरंब कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या