🌟शिबिरात डॉ.श्रद्धा वाघमारे यांनी मार्गदर्शन करते वेळेस विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबद्दल माहिती सांगितली🌟
पुर्णा (दि.१६ सप्टेंबर २०२३) - पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागअंतर्गत आज मुलींसाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासणी करण्यात आले. याप्रसंगी महिला तक्रार निवड समितीच्या सदस्य डॉ.श्रद्धा विनय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, सहसचिव प्रा .गोविंद कदम,प्रा.डॉक्टर संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात डॉ.श्रद्धा वाघमारे यांनी मार्गदर्शन करते वेळेस विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबद्दल माहिती सांगितली.
हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला
हिमोग्लोबिन आणि निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी तुमच्या शरीराला लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे शरीरातील लोह तसेच व्हिटॅमिन बी12, फोलेट आणि प्रथिने यांचा नियमित पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. तुम्ही संतुलित आहार घेऊन किंवा आहारातील पूरक आहार घेऊन ही पोषकतत्त्वे मिळवू शकता.शरीरात लोहाची कमतरता दूर होण्यासाठी पालक, मोहरी, मेथी, कोथिंबीर, पुदीना, ब्रोकोली, कोबी, सोयाबीन, काकडी खाल्या पाहिजेत शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, आहारामध्ये अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करा. पालकच्या भाजीमध्ये सर्वाधिक लोह.
लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकततो.ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.महाविद्यालयातील एकूण 70विदयार्थ्यांनी हिमोग्लोबिन चेक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पुष्पा गंगासागर, प्रा.अजय कुर्रे कार्यक्रमाधिकारी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत या शिबिराचे आयोजन केले या शिबिरास विदयार्थ्यांनी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते......
0 टिप्पण्या