🌟या पायी रॅलीचे नेतृत्व डिवायएफआय संघटनेचे जिल्हासचिव नसीर शेख यांनी केले🌟
पुर्णा (दि.१७ सप्टेंबर २०२३) - डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून पूर्णा शहरातील महात्मा फुले नगर,डॉ. आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर येथील विविध समस्यांना घेऊन पायी रॅली काढत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे: १. डॉ. आंबेडकर नगर येथील कमानीपासून अमोल नगर कॉर्नर पर्यंत पक्का रस्ता बांधणे २. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भूमिगत विद्युत खांब बसवणे ३. रेल्वे भिंती लगतचा रस्ता पक्का बांधणे व विद्युत खांब बसवणे ४. डॉ. आंबेडकर नगर येथील कमानीजवळील कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच तिन्ही नगर मधील कचऱ्याची विल्हेवाट लावणे ५. पक्क्या नाल्या बांधणे व त्यांची नियमित सफाई करणे ६. रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजूंनाच मिळाला पाहिजे ७. गायरानाचे कारण न देता मालकी हक्क प्रमाणपत्रा विना दोन्ही घरकुल योजनेचा लाभ तिन्ही नगरातील गरजूंना देण्यात यावा ८. घंटागाड्या पूर्ववत सुरु करणे.
या पायी रॅलीत डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हासचिव नसीर शेख, जिल्हा व तालुका कोषाध्यक्ष जय एंगडे, तालुका सहसचिव अजय खंदारे, प्रबुद्ध काळे आकाश भगत, याशिवाय समता सैनिक दलाचे प्रमुख पदाधिकारी सुनील मगरे आणि संदेश खाडे, नागरिकांतून भूषण भुजबळ, वामन खर्गखराटे, किशोर आढाव, विशाल खंदारे आदींसह इतर बरेच जण सामील होते....
0 टिप्पण्या