🌟सोन्याची अंडी देणारी 'कोंबडी' कार्पोरेट टोळक्यांना भेटली आहे : भयंकर आर्थिक घोटाळा ठरेल कदाचित...!


🌟पण असा उठसुठ स्मार्टपणा बराच महागात पडू शकतो 🌟

    आजकाल चहाच्या टपरीवर देखील १ रूपया पासुन पुढं कितीही पैसे स्विकारण्यासाठी वेगवेगळ्या ॲप चे स्कॅनरकोड ठेवलेले असतात आणि काहीजन आधुनिक टेक्नॉलॉजी ला खुप अपडेट व स्मार्ट आहे हे दाखवण्यासाठी १ रूपयाची बडीशेप पुडी जरी पान टपरी वर घेतलीं तर १ रुपया चे बिल सुध्दा कोड स्कॅन करून ॲपवरून भरणारे अतिस्मार्ट महाभागही आहेत ती सोय नक्की च चांगली आहे परंतु अगदीच अडचणीच्या वेळी पर्यायी व्यवस्था म्हणून ठिक आहे. 

* पण असा उठसुठ स्मार्टपणा बराच महागात पडू शकतो :-

 100 रुपयाची एक रोख नोट एक लाख  वेळा जरी देवाण-घेवाणीत फिरली तरी तिचे मूल्य हे 100 रुपयेच राहणार आहे, कुणालाही त्या 100 रुपयातून कमिशन अथवा दलाली मिळणार नाही पण हेच 100 रुपये जर वेगवेगळ्या ॲप मधुन कॅशलेस पद्धतीने फिरले तर प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला 2.5% (कमी जास्त हा दर असू शकतो ) असे कमिशन द्यावे लागेल याचा अर्थ असा कि हे 100 रुपये जर एक लाख वेळा फिरले तर त्यातून 2,50,000 (अडीच लाख) रुपये हे फक्त कमिशन म्हणून ती सेवा देणारी कंपनी कमवत असते Paytm ,गुगल पे,फोन पे सारख्या कंपन्या या फक्त आपण करत असलेल्या 100 रुपयाच्या व्यवहारावर बसल्या बसल्या लाखो रुपये कमवत असतात.म्हणून हि सोन्याची अंडी देणारी कोंबडी कार्पोरेट टोळक्याना भेटली आहे 

हा घोटाळा पुढील सर्व  घोटाळ्याची जननीच ठरेल अथवा आतापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांपेक्षा मोठा व भयंकर आर्थिक घोटाळा ठरेल कदाचित डेबिट कार्ड वापरताना ०.५ % ते १% इतका चार्ज पैसे घेणा-याला भरावा लागतो.क्रेडिट कार्ड वापरताना १.५%  ते २.५% इतका चार्ज पैसे घेणा-याला भरावा लागतो.आजकाल आपण फार माॅडर्न आहोत  हे दाखवण्यासाठी पाच रुपयांच्या चहाचे पण फोन पे द्वारे जेव्हा बिल देतात. तेव्हा प्रत्यक्ष जरी जेवढ्या ला तेवढेच पैसे गेलेले दिसत असले तरी पेटीएम/फ़्री चार्ज/ जीओ मनी आणि इतर इ वाॅलेट  सुद्धा आपले पैसे बँकेमध्ये ट्रान्स्फ़र करताना  २.५%  ते ३.५% इतका ज्यादा चार्ज बॅंका घेत असतात.

* आपले स्टेटमेंट बारकाईने पाहिले तर हे‌ नंतर लक्षात येते :-

रिझर्व बँकेच्या रेकाॅर्ड प्रमाणे दर महिन्याला  साधारण ३० लाख कोटी  इतकी रक्कम भारतात फ़क़्त एटीएम मधून काढ़ली जाते...आणि या रक्कमे बरोबर ज़र थेट बँक़ेतून काढ़ली ज़ाणारी रोख रक्कम जोडली तर हीच एकत्रीत रक्कम वर्षाला ७५ लाख कोटी  इतकी होते. आणि ही सर्व रक्कम अधिकृत आणि टैक्स भरलेली आहे सर्वात महत्वाचे हे की सध्या भारतात फ़क़्त ३% इतके व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते आहे असे असताना ही एवढी मोठी रक्कम समोर येत आहे.ज़र वर उल्लेख केलेली ७५ लाख कोटी रक्कम कॅशलेस पद्धतीने फिरत राहिली तर २% दराने "इ वाॅलेट" चीं कामे करणाऱ्या खाज़गी कंपन्याना किती फ़ायदा होत असेल ? 

*चक्क वर्षाला कमीतकमी १.५ लाख कोटी :-

सध्याच्या जमान्यातला हा सगळ्यात मोठा रहस्यमयी घोटाळा असावा.. गुगल पे इत्यादि कंपन्या चक्क १.५ लाख कोटी इतका प्रचंड नफ़ा दर वर्षी कमाऊ शकतात....आधुनिक टेक्नॉलॉजी अडचणीत पर्याय म्हणून वापरणे व सर्रास धोपटणे यातील हा फरक आहे.

आपल्या ज्ञानाचा फायदा निश्चितच पहिल्यांदा आपल्याला व इतरांना ही होतो.. पण अज्ञानाचा फायदा मात्र फक्त इतरांना च होतो..


श्रीनिवास कुलकर्णी

अधिवक्ता, उच्च न्यायालयj

खंडपीठ, औरंगाबाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या