🌟जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी मुलाखतीचे आयोजन🌟
परभणी : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५४ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.तरी परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २५ सप्टेंबर, २०२३ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करून त्यामधील एसएसबी-५४ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा व्हाटसअप क्रमांक ९१५६०७३३०६ वर एसएसबी ५४ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल.शिफारसपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट यामधील माहिती पूर्ण भरून सोबत येऊन यावे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एस.एस.बी कोर्ससाठी प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावेत.
उमेदवार कंम्बाइंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस अकादमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास झालेले आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिवर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एस.एस.जी कॉल लेटर असावे. शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून परभणी जिल्ह्यातील नवयुवक व नवयुवतींनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे....
*****
0 टिप्पण्या