🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहळा शिवारात स्कूल बस उलटली : चार विद्यार्थी जखमी....!


🌟बस रस्त्याखाली उलटली. प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ धाव घेवून स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरळीतपणे बाहेर काढले🌟

परभणी (दि.23 सप्टेंबर २०२३) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहळा शिवारात आज शनिवार दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी एक स्कूलबस उलटल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

             हरंगुळ, मानकादेवी,उखळी,धनगर मोहा,वगैरे भागातील विद्यार्थ्यांना दररोज ने-आण करणारी एक स्कूल बस नेहमीप्रमाणे जात होती. धनगर मोहाळा शिवारात ही स्कूल बस रस्त्याखाली उलटली. प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ धाव घेवून स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरळीतपणे बाहेर काढले. यातील चार विद्यार्थी जखमी अवस्थेत होते. त्यातील काहींनी गंगाखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या स्कूल बसमध्ये जवळपास 30 विद्यार्थी होते अशी माहिती हाती आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या