🌟विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केले धार्मिक सामाजिक दखावे🌟
पुर्णा (दि.२९ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरात काल गुरुवार दि.२८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जना दरम्यान आनंद नगर परिसरातील आनंद गणेश मंडळाच्या मिरवणूकीवर टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्याची घटना वगळता शहरासह तालुक्यात सर्वत्र गणपती विसर्जन शांततेत पार पडले दरम्यान या एका घटनेमुळे पुर्वी शहराला लागलेला अतिसंवेदनशीलतेचा कलंक पुन्हा गडद झाल्याचे बोलले जात आहे.
पुर्णा शहरासह तालुक्यात गणपती विसर्जनाला दुपारी लवकरच सुरूवात झाली होती छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी लवकरच आप आपले गणपती अत्यंत शांततेत भक्तीमय वातावरणात विसर्जीत केले शहरातील २५ गणपती गणेश मंडळाचे गणपती विसर्जन रात्री १२-३० वाजेपर्यंत तर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील ६५ गणेश मंडळाचे गणपती विसर्जन ११-१० वाजता संपन्न झाले "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..." च्या जयघोषाने शहरातील मानाच्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूकीला सायंकाळी ०६-०० वाजता सुरूवात झाली शिवाजी गणेश मंडळ,ओम गणेश मंडळ यांच्या पाठोपाठ शहरातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी नियोजन पुर्वक श्री च्या विसर्जन मिरवणूकिस सुरुवात केली.शहरातील अडत व्यापारी गणेश मंडळाच्या गणरायाला व्यापाऱ्यांनी ढोल ताश्याच्या गजरात दुपारी पाच वाजता विधिवत पूजनानंतर गणरायाचे पूर्णा नदी पात्रात विसर्जन करण्यात केले.
सायंकाळी सहा वाजल्या पासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. श्री महावीर गणेश मंडळ मिरवणुकीत सामील झाले.त्यांनी महाकाल आरतीचा भव्य देखावा सादर केला.श्री सुवर्णकार गणेश मंडळाने मध्यप्रदेश मधील नुकत्याच अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा हृदय स्पर्शी देखावा सादर केला.श्री वाल्मिकी गणेश मंडळाने राजकीय घडामोडी,नेते,कार्यकर्ते यांचा देखावा दाखवला.श्री ओम् गणेश मंडळाने वराह स्वामींचा धार्मिक देखावा सादर केला.त्रिशुल गणेश मंडळाने बागेश्वर बाबा चा देखावा सादर केला.
विविध देखावे पाहण्यासाठी पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील लहान लेकराबाळासह महीला यांनी जुना मोठा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्व गणेश मंडळ यांनी देखावे सादर केले . रात्री आकरा वाजता देखावे पाहील्यानंतर जुना मोठा येथे मिरवणूकीची सांगता झाली नंतर पूर्णा नदी पात्रात विसर्जन करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली एका पाठोपाठ श्रींचे विसर्जन करण्यात आले .पोलिस प्रशासन , नगर पालिका प्रशासन , एम एस इ बी चे सर्व कर्मचारी , तहसिल प्रशासन , शांतता कमिटीचे सद्स्य अदी सर्वांनी विसर्जन मिरवणूकीमध्ये सहकार्य केले.....
* तालुक्यातील ग्रामीण भागात देखील गणपती विसर्जन शांततेत :-
पुर्णा तालुक्यातील तालुक्यातील ग्रामीण भागात देखील गणपती विसर्जन शांततेत पार पडले पडले असून तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल,एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कल,चुडावा जिल्हा परिषद सर्कल,कावलगाव जिल्हा परिषद सर्कल,ताडकळस जिल्हा परिषद सर्कल,वजूर जिल्हा परिषद सर्कल आदी सर्कल मधील गावांतील गणेश मंडळांनी आपापल्या गणपती बाप्पाचे विसर्जन परिसरातील नद्या ओढ्यांमध्ये अत्यंत धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला...
0 टिप्पण्या