🌟गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंचा प्रसिध्दी पत्रकाद्वारे इशारा : खा.संजय उर्फ बंडू जाधवांच्या आरोपांना ठरवले ‘चिल्लर’🌟
परभणी : परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या 'गंगाखेड शुगर्स' विरोधात काढलेल्या मोर्चामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून खासदार विरुध्द आमदार असा चांगलाच संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली असून खासदार जाधव यांनी केलेल्या आरोपांना आमदार गुट्टे यांनी प्रसिध्दी पत्रक काढून उत्तर दिले असून त्यांनी असे म्हटले आहे की आपल्यावर आरोप होणे नवीन नाही. जे आरोप काल झाले,तेच आरोप आजही झालेत,फक्त आरोप करणारी माणसं बदलली आहेत पण आपणास संकटे आणि संघर्षाचा चांगला अनुभव आहे त्यामुळे आपल्या विरूध्द मोर्चा काढून झालेले आरोप हे निव्वळ ‘चिल्लर’ असून आपण त्या आरोपांना फार किंमत देणार नाही मात्र माय-बाप जनतेचा गैरसमज होवू नये म्हणून काही दिवसात ‘ईंट का जबाब पत्थर सें देंगे’ या रोखठोक शब्दात आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज मंगळवार दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार जाधव यांच्या मोर्चाचा खरपूस समाचार घेतला.
सध्या राज्यात सामाजिक कलह सुरू आहेत. अशावेळी सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून आवाहन केले सरकारचा एक घटक म्हणून त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव असल्याने आपण प्रश्न मार्गी लागल्यानंतर तिसर्या दिवशीच परभणीत जाहीर पत्रकार परिषद किंवा उत्तर सभा घेवून विरोधकांच्या म्हणजे मोर्चातील सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देवू, असा इशाराही आमदार गुट्टे यांनी दिला.
आपल्या कार्यक्षेत्रात इतके वर्ष सत्ता भोगूनही आपण जिल्ह्यातील जनतेसह जिल्ह्याच्या विकासाकरीता नेमके ठोस काय केले ? याचे उत्तर खरेतर विरोधकांनी दिले पाहिजे परंतु विरोधक त्याचे उत्तर देवू शकणार नाहीत, कारण विरोधकांनी स्वतःच्या स्वार्था पलिकडे कोणाचाही विचार केला नाही असे नमूद करीत आमदार गुट्टे यांनी आरोपचं करायचे असतील तर, आपल्याकडेही भरमसाठ माहिती संकलित आहे त्या गोष्टीही आपण जनतेच्या दरबारात मांडू असा इशारा आ.डॉ.गुट्टे यांनी दिला.
मोर्चाची घोषणा झाल्यापासून मतदारसंघातील गावोगावचे शेतकरी भेटून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत होते. प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी तर, आमच्या गावातून कोणीही मोर्चात सहभागी झाले नाही. आम्ही कालही, आजही आणि उद्याही आपल्या व कारखान्या सोबत आहोत, असा विश्वास शेतकरी बांधव, सरपंच सतत मोबाईलद्वारे देत आहेत, हिच आपली ऊर्जा आणि ताकद आहे. त्यामुळे विरोधकांना आपण कधीही भीक घालत नाही. आपण टीकेला कामातून उत्तर देणार्यांपैकी आहोत, असे म्हटले.
* केवल हंगामा खडा करना उनका काम...
जनतेच्या भक्कम पाठबळावर ताकदीच्या जोरावर आपण विरोधकांना परुन उरू आणि ही जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. कारण, केवल हंगामा खडा करना उनका काम हैं, मेरी कोशिश हैं की, उनकी सूरत बदलनी चाहिए, असाही शायरीवजा टोला आ.डॉ.गुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विरोधकांना हाणला आहे
0 टिप्पण्या