🌟महाराष्ट्र शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीत ठराव पारित...!

 


🌟ब्राम्हण समाज हा सद्यपरिस्थितीत खुप हलाकीचे जीवन जगत आहे त्यामुळे समाजाला आर्थिक मदतीची नितांत गरज🌟

परभणी (दि.११ सप्टेंबर २०२३) - परभणी शहरातील शनिवार बाजार येथील रेणुका माता मंदिरात रविवारी १० सप्टेंबर सायंकाळी ६ वा.आयोजित केलेल्या बैठकीतून सकळ ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ  स्थापन करावे असा एकमुखाने ठराव करण्यात आला.त्या साठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली.

 ब्राम्हण समाज हा सद्यपरिस्थितीत खुप हलाकीचे जीवन जगत आहे, त्यामुळे समाजाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.समाजात सुशिक्षीत खुप आहेत परंतु सुशिक्षित लोकांची देखील बेकारी निर्माण होत आहे. सरकारने अमृत योजना चालू करून त्यात ब्राह्मण समाजाला काहीही फायदा होत नाही. त्यासाठी एक स्वतंत्र महामंडळाची गरज आहे. या महामंडळास परशुराम आर्थिक विकास महामंडळ  असं नाव द्यावं. आसा सूर व्यक्त करण्यात आला.

समाजातील बेकारी दूर करण्याकरिता केवळ"भगवान परशुराम आर्थीक विकास महामंडळ" आता ह्या साठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती च्या मार्फत महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा,अन्् मागणीसाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला.. हा लढा संपूर्ण महाराष्ट्रातून उभा करण्यांत येणार असल्याचा मानस व्यक्त करण्यात आला.या कार्याची मुहूर्तमेढ परभणीतुन सुरू झाली आहे.

जोपर्यंत महाराष्ट्र शासन 'परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर करणार नाही तोपर्यत हा लढा महाराष्ट्रभर ह्यापेक्षा देखील उग्र स्वरुपात उभा केला जाईल असा  सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने ठराव पारित करण्यात आला. या बैठकीला सकल ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या