🌟यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ भिमराव मानकरे यांनी हिंदी भाषा व राष्ट्रीय भाषा यावर मार्गदर्शन केले🌟
पुर्णा (दि.१६ सप्टेंबर ) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे औचित्य साधून संपादित केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन गृहविज्ञान विभागप्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.सुरेखा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.हिंदी विभाग प्रमुख डॉ भिमराव मानकरे यांनी हिंदी भाषा व राष्ट्रीय भाषा यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिसभा सदस्य डॉ विजय भोपाळे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय कसाब यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या