🌟परभणी शहरात अद्यावत जिल्हा क्रिडा संकुल उभारण्याकरीता १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर....!


🌟राज्य मंत्रीमंडळाच्या संभाजी नगरात आयोजित केलेल्या बैठकीत मंजूरी🌟

परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) :  परभणी शहराकरीता अद्यावत क्रिडा संकुल उभारण्याकरीता राज्य मंत्रीमंडळाच्या संभाजी नगरात आयोजित केलेल्या बैठकीतून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी या संदर्भातील घोषणा केली.

         परभणी जिल्ह्यात विविध क्रिडांसाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. परंतु, मूलभूत सोयी-सुविधा व मैदाने उपलब्ध नाहीत. परभणी शहराकरीता अद्यावयत तालुका क्रिडा संकुलाची सर्वार्थाने आवश्यकता आहे. ज्यात सर्व क्रिडा एकाच छत्राखाली घेता येतील, असा सूर क्रिडा क्षेत्रातून व्यक्त होत होता. यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडे २५ एक्कर जमीनीची मागणी करण्यात आली. त्यासाठी शासनस्तरावर विशेष बाब म्हणून २५ एक्कर तरतूद करणे आवश्यक ठरले. त्या अनुषंगाने महसूल व विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांनी २४ ते २०२२ रोजी कृषी विद्यापीठांतर्गत खानापूर गावाजवळ असलेल्या जमीनीपैकी सर्वे नं. १४४,१४५ मधील २५ एक्कर जमीन जिल्हा क्रिडा संकुलाकरीता उपलब्ध करुन द्यावयाच्या प्रस्तावास कृषि व संशोधन परिषदेने पूर्वमान्यता प्रदाने केली असल्याचे कळवून याबाबतचा प्रस्ताव कृषि परिषदेमार्फत कार्येत्तर मान्यतेकरीता आगामी १०७ व्या कृषि परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला.

          दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोपातून क्रिडा संकूलास मुहूर्त लागला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या